...म्हणून यामीच्या पदरात ही भूमिका आली

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच हृतिकसोबत 'काबिल' या चित्रपटात दिसणार आहे. हृतिकसोबत काम करण्यास ती खूपच उत्सुक आहे. नुकताच तिने या चित्रपटासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मात्र तुम्हाला माहीत आहे का यामीला ही भूमिका कशी मिळाली. 

Updated: Feb 11, 2016, 03:00 PM IST
...म्हणून यामीच्या पदरात ही भूमिका आली title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच हृतिकसोबत 'काबिल' या चित्रपटात दिसणार आहे. हृतिकसोबत काम करण्यास ती खूपच उत्सुक आहे. नुकताच तिने या चित्रपटासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मात्र तुम्हाला माहीत आहे का यामीला ही भूमिका कशी मिळाली. 

या चित्रपटासाठी यामीला पहिली पसंती नव्हती. करीना कपूर, परिणीती चोप्रा या ए-लिस्ट अभिनेत्रींनी या चित्रपटाची ऑफर न स्वीकारल्याने यामीला या भूमिकेसाठी निवडण्यात आले. बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींनी हा चित्रपट नाकारण्याचे कारण म्हणजे या चित्रपटात नायिकेचा मध्यांतरापूर्वीच मृत्यू होता. या चित्रपटात अभिनयास वाव मिळणार नसल्यानेच ए-लिस्ट अभिनेत्रींनी काम करण्यास नकार दिला. मात्र याचा फायदा यामीला झालाय.

एका अंध माणसाच्या कहाणीवर आधारित हा चित्रपट आहे. त्याच्या प्रेयसीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा तो बदला कसा घेतो याची कहाणी यात सांगितलीये. ही कहाणी सलमानच्या बुलंदसारखीच आहे.  यामीला जी भूमिका देण्यात आलीये ती केवळ चित्रपटाच्य मध्यांतरापर्यंतच आहे त्यानंतर नाही. त्यामुळेच बाकी अभिनेत्रींनी या चित्रपटासाठी नकार दिलाय. यामी यात एका अंध मुलीची भूमिका साकारणार आहे.