अमिताभच्या बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीस अटक

अमिताभ यांच्या बंगल्यात घुसणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याची भिंत ओलांडून हा व्यक्ती बंगल्यात शिरला होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Aug 1, 2016, 03:37 PM IST
 अमिताभच्या बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीस अटक title=

मुंबई : अमिताभ यांच्या बंगल्यात घुसणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याची भिंत ओलांडून हा व्यक्ती बंगल्यात शिरला होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या व्यक्तीने बेकायदेशीर बच्चन यांच्या बंगल्यात प्रवेश केला, त्यावेळी अमिताभ बच्चन घरात होते, रविवारी दुपारी हा युवक बंगल्याची भिंत ओलांडून आत आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या व्यक्तीला अटक केली.

बुलट बनवारीलाल यादव असं या युवकाचं नाव आहे, तो बिहारचा आहे, तो गायक असल्याचं सांगतो, त्याला अमिताभ यांच्यासाठी एक गाणं गायचंय, असं तो सांगतो.

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर रविवारी फॅन्सीची गर्दी होते, त्यातील बुलट बनवारीलालने भिंत ओलांडून अमिताभ यांना भेटण्याचा प्रयत्न केला.