जंक फुड बनवतं नपुंसक

बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारख्या जंक फुडच्या नावाने तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर, आपल्या मनाला आवर घाला. एका नव्या संशोधनानुसार अशा प्रकारचं जंक फूड खाणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकत्व येण्याची शक्यता असते.

Updated: Nov 17, 2011, 03:02 PM IST

लंडन- बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारख्या जंक फुडच्या नावाने तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर, आपल्या मनाला आवर घाला. एका नव्या संशोधनानुसार अशा प्रकारचं जंक फूड खाणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकत्व येण्याची शक्यता असते.

 

अमेरिकेतल्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीतल्या आणि आणि स्पेनच्या मर्सिया युनिव्हर्सिटीतल्या अभ्यासकांच्या मते ज्या आहारात ट्रांस फॅट मोठ्या प्रमाणावर असतात, असे पदार्थ तरुणांच्या वीर्यावर परिणाम करतात. डबाबंद पदार्थांमध्ये ट्रांस फॅट मोठ्या प्रमाणावर असतात.

 

“चौरस आहार खाण्यानेच शरीरात वीर्यवृद्धी होते हे आमच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे” असं या विषयावरचा अभ्यासक ओड्रे गॅसकिंस याने सांगितलंय.  (एजन्सी)