धुम्रपान बनवतं नपुंसक

सिगारेट पिऊन तुम्ही स्टाइल मारू शकता किंवा टेन्शन घालवण्याचा उपाय म्हणजे धुम्रपान असा समजही करून घेऊ शकतात. मात्र सिगरेट पिण्याचं व्सन पुरूषांना नपुंसक बनवू शकतं, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

Updated: Jul 17, 2012, 04:40 PM IST

www.24taas.com, बीजिंग

 

सिगारेट पिऊन तुम्ही स्टाइल मारू शकता किंवा टेन्शन घालवण्याचा उपाय म्हणजे धुम्रपान असा समजही करून घेऊ शकतात. मात्र सिगारेट पिण्याचं व्सन पुरूषांना नपुंसक बनवू शकतं, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

 

बीजिंगमधील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) तंबाखू, आरोग्य सहयोग केंद्राचे संचालक वांग चेन म्हणाले, धुम्रपानाच्या व्यसनामुळे लैंगिक समस्या उद्भवू शकतात. याबाबत अमेरिका आणि युरोपमध्ये चर्चा झाली असली तरी चीनमध्ये या विषयावर फारशी माहिती दिली गेली नाही.

 

वांग यांनी तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत सांगितलं की धुम्रपानामुळे वंध्यत्व येतं हे जगाला समजणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी १५ ते ६० वर्षांच्या १२,७४३ चीनी पुरूषांचं परीक्षण केलं गेलं. त्यातील १७.१ % पुरूष नपुंसक होते. २००७ साली केल्या गेलेल्या एका संशोधनात असं समोर आलं होतं की धुम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धुम्रपान करणाऱ्यांमध्ये वंध्यत्व येण्याची शक्यता १.४१ टक्क्यांनी जास्त असते. तसंच धुम्रपानामुळे जाडेपणा, मधुमेह यांशिवाय अनेक घातक रोग होऊ शकतात.