महिला पुरूषांमध्ये काय शोधत असतात...

Last Updated: Wednesday, April 4, 2012 - 15:26

www.24taas.com

 

जर का तुम्ही विचार करीत असाल की, महिलांना फक्त ताकदवान पुरूषच आवडतात, तर असं नक्कीच नाहीये. नुकतचं एका संशोधनातून समोर आलं आहे की, महिलांशी नम्रपणे वागणारे पुरूष हे खूपच आवडतात, आणि त्यामुळे त्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत असतात. त्यामुळे अशा पुरूषासोबत सेक्स करण्यासाठी महिला नेहमीच पुढकार घेतात.

 

संशोधकांनी पुरूषांच्या आवाजाचं सुद्ध ा विश्लेषण केलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, मृदू आवाज असणारे पुरूष सेक्समध्ये आपल्या पार्टनरला खूश करण्याची क्षमता ठेऊन असतात.

 

अनेक महिलांना पुरूषांसोबत सेक्स करताना एक मोकळेपणा हवा असतो, पण काही पुरूष सेक्स करताना आपल्या पार्टनरला समजून न घेताच सेक्स करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे महिलां अशा पुरूषांपासून संतुष्ट नसतात. असे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे महिलांना मोकळेपणा देण्याची गरज आहे.

 

तसचं महिलांची सेक्सबद्दलची धारणा दिवसेंदिवस बदलत चालली आहे. त्या सेक्सविषयी अधिक मोकळेपणाने बोलतात त्यामुळे त्यांना सेक्स करताना देखील त्यांच्या पार्टनरकडून वेगळ्या गोष्टीची अपेक्षा असते.

 

 

 

First Published: Wednesday, April 4, 2012 - 15:26
comments powered by Disqus