'सेक्स पॉवर' जागृतीसाठी योगा

Last Updated: Saturday, December 24, 2011 - 16:52

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

जीवनामध्ये 'सेक्स' महत्वाचा आहे. 'सेक्स पॉवर' जागृत करण्‍यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक आहे. योगा केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. हीच ऊर्जा 'सेक्स पॉवर' जागृत करते आणि आपल्याला  'सेक्स' चा आनंद लुटता येतो. त्यातून खूश राहतो.

 

 

ऊर्जेचा केंद्रबिंदू सूर्य देवता आहे. हा ऊर्जेचा केंद्रबिंदू योगा केल्याने तयार होतो. म्हणजेच सूर्य हा ऊर्जेचा केंद्रबिंदू म्हणजे आपली कामवासना होय. कामवासना ही सूर्य ऊर्जेद्वारा जागृत केली जाते. आपल्यात 'सेक्स पॉवर' जागृत करण्‍यासाठी योगासनांचे महत्त्व आहे.

 

 

योगशास्त्रज्ञांच्या मते व्यक्तीच्या सेक्स ऊर्जेची दिशा जर भरकटली असेल तर त्याचा विपरित परिणाम त्याच्या वैवाहिक जीवनावर होत असतो. आपल्या शरीरात योगासनांनंतर 'सेक्स पॉवर' जागृ‍त झालेली असते. तर कामक्रीडा झाल्यानंतर जेव्हा आपण थकतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जेची सक्रियता कमी होत असते. त्यामुळे आपल्याला कामक्रीडा झाल्यानंतर लगेचच झोप लागते.
'सेक्स पॉवर' जागृतीसाठी योग व योग मुद्रा नियमित करावी लागते. काही दिवसात आपल्या सेक्स जीवनावर त्याचा अनुकुल परिणाम जाणवेल. आपले स्नायू बळकट होतात. तर आपल्या कामोत्तेजीत इच्छा मारणारी चरबी कमी होते. त्यामुळे आपण आनंदी होतो. हा या योगा करण्याचा फायदा असतो.

 

 

काही व्यक्ती जाड तसेच लठ्ठ असतात.  त्यामुळे सेक्स जीवनात त्यांना समाधान मिळत नाही  लठ्‍ठपणामुळे त्यांना झोपेवर नियंत्रण करणे शक्य नसते. त्यामुळे कामवासने प्रति त्यांच्या अरुची निर्माण होते. भरपेट जेवल्यामुळे  आळस व सुस्ती येते. ही कामोत्तेजनासाठी मारक ठरते. योगसाधना करून आपण आपले वजन आणि लठ्ठपणा कमी करू शकता.

 

 

काही जण शरीरीकदृष्टया दुबळे असतात.  जास्त आहार घेण्यापेक्षा व्यायाम व योगाभ्यास करून आपले स्नायू बळकट केले पाहिजेत. त्यातून आपल्या आयुष्यातील हरवलेला आनंद पुन्हा परत मिळवायचा असेल तर नियमित योगा करून आनंददायी जीवनाचा 'योग'  साधायला मदत होते. सुखी जीवनासाठी मग करणार ना, योगा.

First Published: Saturday, December 24, 2011 - 16:52
comments powered by Disqus