सेक्स वर्करसाठी सुरू होतोय प्रोफेशनल कोर्स....

Last Updated: Saturday, July 7, 2012 - 16:31

www.24taas.com, माद्रिद

 

वेश्या व्यवसाय आपल्या समाजाची एक काळी बाजू... वेश्यांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच घृणास्पद असते. त्यामुळे आपला समाज त्या महिलांना कधीच स्विकारत नाही. किंबहुना जास्तच दृलक्षित करीत असतो. त्यामुळे त्यांच्या मनात सामान्या माणसाविषयी जास्तच चीड निर्माण होते. पण जर तर तुम्हांला सांगितलं की, वेश्या व्यवसाय करण्यासाठी बाजारात त्याचे तंत्रशुद्ध असे कोर्स उपलब्ध झाले आहेत. किंवा त्याचा अभ्यासक्रम आहे. तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे.

 

स्पेनच्या वेलेनिकामधील एका कंपनीने वेश्याव्यवसायासाठी प्रोफोशनल असे कोर्स सुरू केले आहेत. कंपनी ग्रॅज्यूएशन नंतर तुम्हांला नोकरी देण्याची शाश्वतीही देते.. सुत्रांच्या माहितीनुसार १०० युरो खर्च केल्यानंतर तुम्हांला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल. यात तुम्हांला वेगवेगळ्या पद्धतीने शिकविलं जाणार आहे. अभ्यासक्रमात सेक्सशी संबंधित गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थींना सेक्सविषयी संपूर्ण ज्ञान मिळणार आहे.

 

कंपनीच्या मते दररोज दोन तास शिकवलं जाईल. तर या कोर्ससाठी फक्त १०० जणांनाच प्रवेश मिळू शकणार आहे. १९ ते ४५ वर्षामधील स्त्री किंवा पुरूषांना प्रवेश असणार आहे. या कोर्सबाबत बाजारात खूपच चर्चा सुरू आहे. कंपनीच म्हणणं आहे की या अभ्यासक्रमामुळे देहाचा व्यापार हा जास्त सुरक्षितपण करता येणार आहे. आणि शिक्षित सेक्स वर्कर तयार होतील. जे कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतही काम करणार नाहीत..

 

 

 

First Published: Saturday, July 7, 2012 - 16:31
comments powered by Disqus