हृदयरोगी असाल, तरीही सेक्स कराल

हृदयरोग असणाऱ्यांसाठी एक सेक्सची खूश खबर आहे. ज्यांना हृदयरोग असलेल त्यांनी आता बिनधास सेक्स केला तरी त्याचा ताण मनावर येणार नाही. या रोगामुळे ज्यांनी शरीर संबंध कमी केले असतील किंवा थांबविले असतील त्यांनी पुन्हा

Updated: Jan 27, 2012, 01:28 PM IST

www.24taas.com , वॉशिंग्टन

 

हृदयरोग असणाऱ्यांसाठी एक सेक्सची खूश खबर आहे.  ज्यांना हृदयरोग असलेल त्यांनी आता बिनधास सेक्स केला तरी त्याचा ताण मनावर येणार नाही. या रोगामुळे ज्यांनी शरीर संबंध कमी केले असतील किंवा थांबविले असतील त्यांनी पुन्हा संबंध कायम ठेवण्यास काहीही हरकत नाही. याबाबत अमेरिकेतील एका हार्ट संस्थेने संशोधन करून याबाबत निष्कर्ष काढला आहे.

 

अमेरिकेतील एका अग्रगण्य संशोधन करणाऱ्या संघटनेने म्हटले आहे की, जे हृदयरोगी आहेत ते जर जोरात चालले तर अथवा जीणे चढलात तरीही तुमच्या छातीत दुखले नाही किंवा दम लागला नाही तर अशी व्यक्ती शरीरसंबंध ठेऊ शकते. त्याच्यासाठी सेक्स सुरक्षित आहे. मात्र, असे असले तरी तज्ज्ञांच्यामते  शरीरसंबंध ठेवण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यता आहे.

 

हेल्थ.कॉम ने  ह्यूस्टन येथील बेलर कॉलेज ऑफ मेडिसनचे ग्लेन लेविन यांचा सल्ला घेतला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार  हृदयरोगाची खात्री असलेल्यांना सेक्सची भिती वाटते किंवा जोडीदार तणावाखाली असतो. काहींवर इलाज झाला तरी शरीरसंबंध कायम ठेवण्यासाठी तणावाखाली येतात.

 

जे लोक व्यायामावर भर देतात किंवा नेहमी व्यायाम करतात अशांना सेक्स करताना काही समस्या जाणवत नाही. जे हृदयरोगी असतात त्यांनी घाबरून जाऊ नये. सेक्स करताना हृदयरोग्याला धापा लागण्याची शक्यता कमी असते.