शुक्राणू वाढविण्याचे पाच उपाय

जगभरात शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता कमी होत असल्याचा तक्रारी वाढत आहे. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही खास उपाय अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

प्रशांत जाधव | Updated: Jun 5, 2014, 09:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगभरात शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता कमी होत असल्याचा तक्रारी वाढत आहे. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही खास उपाय अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
लाल रंगाचे जेवण
अमेरिकेतील ओहिओ क्लिवलँड क्लिनिकने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरातील वेगवेगळ्या गटांवर १२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात असे समोर आले की, लायकोपेनचे सेवन म्हणजे लाल रंगाचे पदार्थ खाल्याने शुक्राणूंची क्षमता, वहन आणि संख्या झपाट्याने वाढते. शुक्राणूच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ होते. लायकोपेन आपल्याला लाल रंगाची फळे, भाज्यामध्ये मिळते. यात टोमॅटो, स्ट्रॉबेरी, चेरी लायकोपेनचे प्रमाण अधिक असते.
लॅपटॉप सोडा
2011 मध्ये वंध्यत्व आणि फर्टीलीटी या संदर्भात झालेल्या अभ्यासानुसार लॅपटॉप आणि वाय-फायमुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत असल्याचे समोर आले आहे. यासाठी २९ व्यक्तींच्या शुक्राणूंचे सॅम्पल घेण्यात आले. त्यानंतर त्यांना लॅपटॉपच्या खाली ठेवण्यात आले. त्यावेळी असे समोर आले की, त्यामुळे शुक्राणू अधिक निक्रिय झाले आणि त्यातील गुणसूत्र म्हणजे डीएनए कमकुवत झाले.
बाईक वापरणे कमी करा
सायकल चालवणे हे आरोग्यसाठी चांगले असते पण जेव्हा शुक्राणूंची गोष्ट येते तेव्हा जरा सांभाळून. २००९ मध्ये स्पेनच्या अन्डोल्यूसिएन स्पोर्ट्स मेडीसीन सेंटर आणि लास फाल्मास विद्यापीठ यांनी केलेल्या अभ्यासानुसार प्रदीर्घ काळ आपण बाईक चालविल्यास तुमच्या शुक्राणूची गुणवत्ता कमी होऊ शकते. यावेळी १५ स्पॅनिश व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. हे १५ व्यक्ती दर आठवड्याला ३०० किलोमीटर सायकल चालवत होते. त्यांना फर्टीलिटीचा प्रॉब्लेम आहे.
थंड वातावरणात राहा
३४.५ अंश सेलिअल्समध्ये शुक्राणूचे उत्पादन होते. हे मनुष्याचा शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते. या संदर्भात २००७मध्ये तीन वर्षांचा अभ्यास करण्यात आला. यातील ११ पैकी पाच व्यक्तींनी गरम पाण्याने अंघोळ करणे थांबवले त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंच्या प्रमाणात वाढ झाली. ती सुमारे ५०० टक्के होती.
कॉफी प्या, पण जास्त नको
ब्राझीलच्या साओ पाओलो विद्यापीठाने २००३ मध्ये केलेल्या अध्ययनात असे समोर आले की कॉफी ही शुक्राणू वहनासाठी चांगली असते. ७५० पुरूषांवर ही चाचणी करण्यात आली. त्यात असे समोर आले की शुक्राणूंच्या वहनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे त्या व्यक्तींकडून गर्भधारणेचा दर अधिक होता. दुसऱ्या एका अभ्यासानुसार असे समोर आले की, दररोज केवळ ३ कप कॉफीच प्यायला हवी. अधिक कॉफी प्यायल्याने अंडाषयापर्यंत जाऊन फर्टीलाइज करण्यात शुक्राणू कमी पडतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.