लैंगिक संबंधाविषयी होतायेत गैरसमज....

Last Updated: Friday, May 3, 2013 - 09:36

www.24taas.com, मुंबई
निसर्गत: माणसाच्या ब्रेनमध्ये झालेल्या प्रिवायरिंग सेटअपमुळे विवाहप्रथा आणूनसुद्धा स्त्री-पुरुषांमध्ये असणारा मुक्त आचरणाचा कल आपण रोखू शकलेलो नाही. विवाहामुळे स्त्री-पुरुष संबंधांचे नियमन होत राहणार आहे, या कल्पनेत आपण राहिल्याने लैंगिक भावनांची दडपणूक कधीपासून सुरू झाली, हे आपल्याला कळलेलेच नाही.
विवाहाने प्रस्थापित केलेल्या पुरुषप्रधान समाजात जर स्त्री-पुरुषांची कामवासना योग्य प्रकारे शमविण्याचा विचार आपण करणार असू, तर पहिल्या प्रथम पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक भुकेची अनिवार्यता समजून घेता आली पाहिजे. जसे पोटाची भूक व्यवस्थित भागत असेल तर आपण अन्नसेवन समाधानाने, आनंदाने करतो.

जे भुकेलेले असतात, ते अन्नावर तुटून पडताना आपण पाहतो. मात्र इथे आपण त्यांची उपासमार समजून घेतो. माणसांनी अन्नावर तुटून पडणे वाईट दिसते म्हणून त्यांची ती भूक, अन्न मिळू न देता दमन करण्याचा विचार कधी कुठे होत नाही. उलट त्यांना अन्न मिळण्याची सहज सोय करण्याचा प्रयत्न होतो. लैंगिक भुकेची नेमकी हीच स्थिती आहे.

First Published: Tuesday, April 30, 2013 - 08:35
comments powered by Disqus