लैंगिक संबंधांचा काळ कमी होतोय...

सेक्स हा मानवी जीवनातील अविभाज्य असा भाग आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सेक्स करण्याचा काळ कमी होत आहे.

Updated: May 3, 2013, 09:36 AM IST

www.24taas.com
सेक्स हा मानवी जीवनातील अविभाज्य असा भाग आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सेक्स करण्याचा काळ कमी होत आहे. अलिकडच्या काळात सामाजिक दृष्टिकोनातून आणि सेक्सच्या नियमांमध्ये खूप बदल झाला आहे. टॅबू नावाचा प्रकार आता उरलेला नाही. सेक्स बाबत असलेले अचार-विचार खूप लिबरल झाले आहेत. सेक्ससाठी लग्नापर्यंत थांबणे ही भूतकाळातील गोष्ट बनली आहे
सेक्सबाबतचा मोकळेपणा वाढत असताना, दीर्घकाळापर्यंत सेक्स आयुष्य जगणे केवळ एक स्वप्न ठरत आहे. या अगोदर जे वय ४० वर्षे होते ते आता घसरून ३० वर येऊ लागले आहे. पूर्वी साठ वर्षांपर्यत देखील पुरुषांमध्ये सेक्स करण्याची क्षमता होती. परंतु, कामाचा ताण, कामाचे व्यापक स्वरूप अशा विविध गोष्टींमुळे जीवनातील यौन संबंध मागे पडू लागले तर दोन्ही पार्टनर नोकरी करत असल्यास परिस्थिती आणखी बिकट होते.

विविध शिफ्टमध्ये अडकलेली नोकरी, पगारवाढीचे ताण, आर्थिक असुरक्षिततेबाबत वाढत असलेला मानसिक त्रास आणि हळूहळू हरवत चाललेली सामाजिक जाण आणि नातेसंबंधांमध्ये असलेल्या असमानतेमुळे त्याचा परिणाम सेक्स लाईफवर होऊ लागला आहे