लैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर

आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.

Updated: May 16, 2013, 08:49 AM IST

www.24taas.com
आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे. आज लिव्ह अॅन्ड रिलेशनशीपला महत्व दिले जात आहे. आपण कसे जगावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सेक्सला खूप महत्वाचे स्थान आहे.
लैंगिंक जीवनाचा आनंद घेण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहजे. तरच आपला वैवाहिक जीवन आणि आनंद टिकून राहतो. अन्यथा जीवनात कटकटी निर्माण होतात. त्यासाठी काही नियम पाळले तर आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर काय कराल? सेक्सचा आनंद घेताना काही नियम स्वत:हून घातले पाहिजेत.
सेक्स करताना अधिक आक्रमक होऊ नका, किंवा आपल्या जोडीदारावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. सेक्स करण्यापूर्वी जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. जोडीदारच्या किंवा तिच्या प्राथमिकता समजून घेवून आपल्या इच्छा थोपवू नका. जोडीदारासोबत सहज व्यवहार करण्यासोबत आवडी-निवडीही लक्षात घ्यातल्या पाहिजेत. तर लैंगिक जीवन सुखकारक आणि आनंदमय होण्यास मदत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.