महिलांनी नियमित सेक्स का करावा

नियमितपणे सेक्स करणाऱ्या महिला या तंदुरूस्त असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान झळकत असतं. महिलाचं सेक्स लाईफ हे त्याच्यासाठी एक प्रकारचं टॉनिक असतं.

Updated: Sep 6, 2012, 05:52 PM IST

www.24taas.com
नियमितपणे सेक्स करणाऱ्या महिला या तंदुरूस्त असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान झळकत असतं. महिलाचं सेक्स लाईफ हे त्याच्यासाठी एक प्रकारचं टॉनिक असतं. सेक्सने समाधान मिळणाऱ्या महिलाच्या तंदुरूस्तीचं खरं गुपित तेच आहे. एका निष्कर्षात ही गोष्ट समोर आली आहे.
संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, योग्य प्रकारे सेक्स संबंध ठेवल्यास महिलांना सतुंष्टी मिळते, आणि त्याचं स्वास्थ देखील उत्तम राहतं. संशोधन करणाऱ्या टीमला ही गोष्ट माहित पडली की नियमीत सेक्स केल्याने महिला खूपच तंदुरूस्त राहतात. संशोधनात जवळ जवळ २६ ते ६५ या वयोगटातील महिला समाविष्ट होत्या. आणि त्यांच्या नियमित सेक्स करण्याचा त्यांच्या शरीरावर किती परिणाम होतो याचा अभ्यास केला गेला.
संशोधनात ही गोष्टही समोर आली आहे की, महिला बऱ्याचदा असंतुष्ट असतात. पण यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की, महिलांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स असते. संशोधनात ही गोष्ट समोर आले आहे की, ज्या महिला नियमित सेक्स करीत नाही किंवा ज्या महिला असंतुष्ट असतात, त्या महिलांना आरोग्याविषयी तक्रार असते.