आता, भाजपनं केली शिवसेनेची सफाई!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर मैदान स्वच्छ करण्याचं आवाहन करतायत आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय... अन्य पक्षांच्या सभांमध्ये मात्र याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसत नाहीय. (केवळ दिखावा करण्यासाठी असेल तर तो भाग निराळा...)

Updated: Oct 9, 2014, 07:35 PM IST
आता, भाजपनं केली शिवसेनेची सफाई! title=

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर मैदान स्वच्छ करण्याचं आवाहन करतायत आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय... अन्य पक्षांच्या सभांमध्ये मात्र याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसत नाहीय. (केवळ दिखावा करण्यासाठी असेल तर तो भाग निराळा...)

औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मैदानावर 7 तारखेला शिवसेनेची सभा झाली. त्यानंतर आजपर्यंत म्हणजेच जवळपास दोन दिवस मैदानावर कचरा तसाच पडला होता... हेच चित्र पाहून भाजपचे कार्यकर्ते मैदानात झाडू घेऊन उतरले... या कार्यकर्त्यांनी ‘शिवसैनिकांनी’ केलेला कचरा साफ करून पूर्ण मैदानाची साफसफाई केली. 

काही दिवसांआधीच मोदींच्या सभेनंतर मुंबईत शिवसैनिकांनी ग्राऊंड स्वच्छ करत गांधीगिरी केली होती. औरंगाबादेत मात्र शिवसैनिकांना त्याचा विसर पडला. त्यामुळं भाजपनं मैदानाची सफाई करत शिवसेनेचा वचपा काढलाय, असं म्हणायला हरकत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.