...राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेला हा उमेदवार!

माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पवार राज्यात सर्वाधिक मताच्या फरकांनी निवडून आलेले उमेदवार ठरलेत. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 19, 2014, 05:36 PM IST
...राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेला हा उमेदवार! title=

बारामती : माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पवार राज्यात सर्वाधिक मताच्या फरकांनी निवडून आलेले उमेदवार ठरलेत. 

अजित पवार यांनी तब्बल 89 हजार 633 मतांच्या फरकानं विजय खेचून आणलाय. त्यांनी भाजपच्या बाळासाहेब गावंडे यांचा पराभव केलाय. 

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अजित पवार यांनी आघाडी घेतलेली दिसली. आठव्या फेरीअखेरीस ते 50 हजार 281 मतांनी आघाडीवर होते. दुपारी 12.45 च्या सुमारास त्यांची ही आघाडी तब्बल 80 हजार मतांच्या फरकानं दिसून आली. 

यानंतर, मात्र भाजपनं ईव्हीएम कोड जुळत नसल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली.  27 मतदान यंत्रांची नोंदच नसल्याचं, भाजपच्या बाळासाहेब गावंडेंचा आक्षेप होता. प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनीही मान्य केलं होतं... त्यामुळ काही काळ  मात्र, सगळं काही ठीकठाक असल्याची खात्री करून पुन्हा मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, विजयाची घोषणा करण्यात आली तेव्हा अजित पवार यांनी तब्बल 89 हजार 633 मतांच्या फरकानं गावंडे यांना मात दिल्याचं जाहीर करण्यात आलं.  

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2009 साली अजित पवार तब्बल 1 लाख 02 हजार 797 मतांनी निवडून आले होते... म्हणजे, यावर्षी मतविभाजनाचा फटका बसलेला स्पष्ट दिसून येतोय.   

महत्त्वाचं म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावर बरीच टीकाही करण्यात आली होती... अनेक नेत्यांनी 'धरणात पाणी नाही तर... मुतू का?' या अजित पवारांच्या वाक्याचा आवर्जुन उल्लेख आपल्या भाषणात केला होता... खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग असल्याचं म्हटलं होतं... इतकंच नाही, तर लोकसभा निवडणुकीत 'सुप्रीया सुळे यांना निवडून दिलं नाही तर गावचं पाणी तोडेन' असं अजित पवार म्हणताना दिसलेली एक व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.