आज बाळासाहेब जिवंत असते तर... - राजनाथ सिंह

गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... युती तुटल्यानंतर, ऐन निवडणुकीच्या सणात त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आलीय.

Updated: Oct 10, 2014, 01:34 PM IST
आज बाळासाहेब जिवंत असते तर... - राजनाथ सिंह title=

मुंबई : गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... युती तुटल्यानंतर, ऐन निवडणुकीच्या सणात त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आलीय.

बालासाहेब जिवंत असते तर आज भाजप-शिवसेनेतील युती तुटली नसती, असं विधान राजनाथ सिंह यांनी मंडरुप इथं केलंय. 

राज्यात 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर एका सभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात ‘महापरिवर्तन’ होण्याची गरज असल्याचं म्हटलंय. 
‘बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही खूप सन्मान करत होतो... आज बाळासाहेब जिवंत असते तर सेना-भाजप युती तुटलीच नसती’ असं म्हणतच त्यांनी लोकांना भाजपला मत देण्याचं आवाहन केलंय.

‘काँग्रेस केवळ भाजप सरकारवर टीका करण्यातच व्यस्त आहे... भाजपनं पेट्रोलच्या दरांत घट केलीच शिवाय महागाईवरही नियंत्रण ठेवलंय’ असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही टीका केलीय. 

महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत... आणि खूप कष्टात आहेत... जर भाजपची सत्ता राज्यात आली तर तालुका स्तरावर कृषि आधारित उद्योग सुरु करून आर्थिक स्थित सुधारली जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.