मोदी लाट एकहाती सत्ता आणण्यास अपयशी

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट दिसून आली. केंद्रात मोदींनी एकहाती सत्ता आणण्यात यश मिळवले. मात्र, महाराष्ट्रात भाजपला सत्तेजवळ जाता आले तरी एकहाती सत्ता आणण्यास अपयश आले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा भाजपला घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय सत्तेचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.

Updated: Oct 19, 2014, 06:09 PM IST
मोदी लाट एकहाती सत्ता आणण्यास अपयशी title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट दिसून आली. केंद्रात मोदींनी एकहाती सत्ता आणण्यात यश मिळवले. मात्र, महाराष्ट्रात भाजपला सत्तेजवळ जाता आले तरी एकहाती सत्ता आणण्यास अपयश आले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा भाजपला घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय सत्तेचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.

सत्तास्थापन करायची असेल, तर भाजपला शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस यापैकी एका प्रादेशिक पक्षाची मदत घ्यावीच लागेल, असे चित्र आहे. त्याचवेळी २००९च्या निवडणुकीचा विचार करता शिवसेनेने चांगली मुसंडी मारत ६३ जागा घेतल्या आहेत. भाजपनंतर शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप (युती) यांच्या पारड्यात कौल टाकला आहे. मतदारांनी या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्रितपणे सत्ता स्थापन करावी, असाच कौल दिला आहे. त्यामुळे आता काय होणार, याची उत्सुकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या २७ सभा, वृत्तपत्रे, वाहिन्या यावरून केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती आणि सोशल मीडियाचा भरमसाठ वापर करूनही भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले.  जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला राज्यात एकहाती सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री कोण यावरून चर्चा सुरू झाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि पंकजा मुडे-पालवे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून चुरस होती. मात्र, बहुमत न मिळ्याने भाजपच्या  गोटात आनंद असला तरी चुटपूट लागली आहे.

 भाजपने निवडणुकीत जी जनतेला आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करण्याची आता कसरत करावी लागणार आहे. एकहाती सत्ता नसल्याने भाजप दुसऱ्यांचा पाठिंबा घेऊन कसे काम करते, यावर पुढील गणिते अवलंबून असणार आहे, असे जाणकारांचे मत आहे. भाजपने  आयात केलेल्या  उमेदवारांपैकी किती जणांना सत्तेत वाटा देणार यावरही बरेच काही अबलंबून आहे. त्यामुळे सत्तेजवळ असताना भाजपला कसरत करावी लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.