फडणवीसांच्या मतदारसंघातही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशा घोषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल केला. दक्षिण-पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार-उमेदवार आण‌ि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‌देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गुंजत आहे. इथे आमदारासाठी नाही, तर भावी मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक होत असल्याची जोरदार चर्चा आहे.यामुळे फडणवीसांच्या विरोधात भक्कम चक्रव्यूह कसा आखता येईल, त्यांना कसं अडचणीत आणता येईल, याची आखणी सुरू आहे.

Updated: Oct 2, 2014, 08:26 PM IST
फडणवीसांच्या मतदारसंघातही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र title=

नागपूर : 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशा घोषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल केला. दक्षिण-पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार-उमेदवार आण‌ि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‌देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गुंजत आहे. इथे आमदारासाठी नाही, तर भावी मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक होत असल्याची जोरदार चर्चा आहे.यामुळे फडणवीसांच्या विरोधात भक्कम चक्रव्यूह कसा आखता येईल, त्यांना कसं अडचणीत आणता येईल, याची आखणी सुरू आहे.

भाजपचा सुरक्षित मतदारसंघ ही दक्षिण पश्चिमची ओळख. भाजपचे संघटनात्मक काम इथे चांगले आहे. त्यामुळे मागील दोन निवडणुकांमध्ये इथे भाजपला चांगले यश मिळाले. 

फडणवीस यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशा जोरदार घोषणा दिल्या होत्या. या घोषणांचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या घोषणेने अनेक भाजपवाले सुखावले आहेत. अनेक दुखावलेदेखील आहेत.

काँग्रेसने यंदा फडणवीसांविरुद्ध तरुण आणि कार्यक्षम नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. गुडधे हेदेखील अभ्यासू आणि वक्ते आहेत. तेही स्वच्छ प्रतिमेचे म्हणून ओळखले जातात. कधीकाळी भाजपच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका निभावणारे माजी राज्यमंत्री विनोद गुडधे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे अंतर्संबंध आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीने माजी नगरसेवक दिलीप पनकुले यांच्या हाती घड्याळ बांधले. 

बसपने प्रदीप पडोळेंना 'हत्ती'वर बसवत रंगत वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या मतदारसंघातील भाजप नगरसेवकाचे बंधू पंजू तोतवाणी हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने थेट प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात बंड करावे, ते कायम ठेवावे हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. ही भाजपमधील देवेंद्रविरोधी गटाची खेळी मानली जात आहे.

काँग्रेसने गुडधेंच्या माध्यमातून फडणवीसांना तगडी फाइट देण्याचा प्रयत्न चालविला आहे. लढत एकतर्फी होणार नाही, याची स्वत: गुडधेदेखील खबरदारी घेत आहेत. कुणबी समाजाचे एकत्रीकरण, जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधत गुडधेंनी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. पक्षातील बडे नेते त्यांच्या पाठीशी आहेत.

 मिहानच्या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारशी घेतलेला पंगा, गेल्या काही निवडणुकांतील भूमिका गुडधेंविरुद्ध प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या आहेत. भाजपची संघटनात्मक शक्ती, जनतेतील प्रतिमा या फडणवीसांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांचे सगळ्याच जातीपातींशी सौख्य आहे. दलितबहुल बुथमध्ये कमळ फुलविण्याचा चमत्कार फडणवीसांनी मागील निवडणुकीत करून दाखविला होता.

फडणवीस नव्या नागपूरसाठी डोकेदुखी ठरलेला मनीषनगरच्या पुलाचा मुद्दा या टर्ममध्ये निकाली काढू शकले नाही. सतरा झोपडपट्ट्यांना मालकी पट्टे देणे, मिहानला मार्गी लावणे, ही आव्हाने नव्या आमदारापुढे असणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.