युतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची उद्या भेट होण्याची शक्यताय. शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक संपलीय. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा सुरू होती.

Updated: Oct 30, 2014, 10:16 PM IST
युतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार title=

नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची उद्या भेट होण्याची शक्यताय. शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक संपलीय. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा सुरू होती.

पण महाराष्ट्रातल्या भाजप सरकारला पाठिंबा न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर सध्या मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित झालीयत. केंद्रात मोदी सरकारसोबत मंत्रीपद भूषवणारी शिवसेना, मुंबई महापालिकेत एकत्र सत्तेत नांदणारी शिवसेना, महाराष्ट्र सरकारमध्ये मात्र विरोधात बसणार, ही कसली रचना? असा सवाल केला जातोय. 

दिल्लीत आणि मुंबईत सत्तेची फळं चाखताना शिवसेनेचा हा स्वाभिमान कुठं जातो? स्थिर सरकारच्या बाजूनं राज्यातील जनतेनं दिलेला कौल शिवसेना नेतृत्वाला कळत नाहीय का? मुळात शिवसेनेचा विरोध नेमका कशासाठी आहे? सेनेची ही भूमिका कालसुसंगत आहे की सेना नेत्यांचा हा निव्वळ अहंपणा आहे? ताठ कणा म्हणजे शिवसेनेला नेमकं काय अभिप्रेत आहे? विरोधासाठी ताठर भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीचं महत्त्व उगीचच वाढतंय का? मराठी बाण्याचा कणा जपण्याचं राजकारण म्हणजे नेमकं काय? आणि युद्धात जिंकणारा मराठी माणूस नेहमी तहात का हरतो? अशी प्रश्नांची सरबत्तीच सध्या शिवसेनेवर होतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.