देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी ?

देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री आज शपथ घेणार आहेत.  

Updated: Oct 31, 2014, 11:57 AM IST
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी ? title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री आज शपथ घेणार आहेत.  

या मंत्रिमंडळात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्वपूर्ण खात्याची जबाबदारी असणार आहे. त्याचवेळी गडकरींचे निकटवर्तीय सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्रीपदाची आशा बाळागणारे एकनाथ खडसे, बोरिवलीचे आमदार विनोद तावडे आणि कोअर कमिटीतील एकमेव महिला आमदार पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे.

आठ कॅबिनेट मंत्री
# देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री,
एकनाथ खडसे
सुधीर मुनगंटीवार
विनोद तावडे
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील, 
 विष्णू सावरा
 प्रकाश मेहता, 

दोन राज्यमंत्री
दिलीप कांबळे
 विद्या ठाकूर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.