मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय- पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या एकाधिकारशाहीवर टीका केलीय. मोदींना सर्व राज्यांचाही रिमोट कंट्रोल आपल्या हाती हवाय.  

Updated: Oct 10, 2014, 02:55 PM IST
मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय- पृथ्वीराज चव्हाण title=

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या एकाधिकारशाहीवर टीका केलीय. मोदींना सर्व राज्यांचाही रिमोट कंट्रोल आपल्या हाती, हवा असून त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीनं भारतात लोकशाही अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी झी मीडियाशी बोलतांना व्यक्त केलीय. 

तसंच आघाडी तुटण्याचं खरं कारण म्हणजे काही नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचं चव्हाण म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टामुळेच आघाडी तुटली असं ते म्हणाले. 

तर आपल्या कारकीर्दीचं त्यांनी योग्य मूल्यमापन केलंय. आपल्या कार्यकाळात एकूण १८५ कॅबिनेट बैठका झाल्या असून ११००-११३० निर्णय घेतले गेल्याचं ते म्हणाले. अनेक प्रलंबित निर्णय घेतले असून नवीन धोरणं आखल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

पण त्याचवेळी आपल्यावर नेहमी बॅक डोअर एंट्री केल्याची टीका झाल्यामुळं आपण कोणतीही सेफ जागा न निवडता होम टाऊनहून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. 

पाहा पृथ्वीराज चव्हाणांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे -  

 

  • आघाडी का तुटली? सांगतायेत पृथ्वीराज चव्हाण
  • भाजपच्या अहंकारामुळं युती तुटली
  • शरद पवार, सोनिया गांधींनाही हवी होती आघाडी
  • अजित पवारांच्या हट्टामुळे आघाडी तुटली, चव्हाणांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका
  • मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली
  • आपल्या कारकीर्दीचं कसं मूल्यमापन करतात पृथ्वीराज चव्हाण?
  • बॅक डोअर एंट्री केल्याची वारंवार टीका
  • म्हणून विधानसभाच लढवायची होती, ती ही होमटाऊनहून, सेफ मतदारसंघातून नाही...
  • स्वच्छ प्रतिमेव्यतिरिक्त काय?
  • अनेक वर्ष जुनी प्रलंबित निर्णय घेतले गेले, चर्चा व्हायची सर्वांचं एकमत होत नव्हतं...
  • चुकीची धोरणं बदलायची होती... आरोप चुकीचे होते
  • ११००-११३० निर्णय, १८५ कॅबिनेट बैठका झाल्या
  • कुठलाही निर्णय जो घेतला तो पारदर्शकपणे झालाय... 
  • आरटीआय अंतर्गत कुणीही चौकशी करू शकतं...
  • आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे... आणि ते पाळले गेले पाहिजे
  • प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं काम करतं... नियमांचं उल्लंघन न करता काम केलं जावंच लागणार
  • अजितदादा यापुढे सहकारी म्हणून आवडतात का?
  • ३६,००० फाईली मी क्लिअर केल्या आहेत - मुख्यमंत्री
  • अखेरच्या वेळेत खूप फाइल्स क्लिअर केल्या हा आरोप चुकीचा
  • मी कोणताही कायदा मोडला नाही, नगरविकास मंत्रालयाबद्दलचा, कोणीही चौकशी करू शकतं
  • मोदींचा फुगा फुटला, असा निर्णय येऊ नये म्हणून भाजपचा प्रयत्न
  • शंभर-सव्वाशे दिवसांमध्ये काही समाधानी काम झालेलं नाही
  • भारताच्या संरक्षण व्यवस्थेवरही ताण वाढलाय
  • अखेरच्या टप्प्यात विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सभा बोलवल्यात 
  • भाजपसमोर चेहरा नाही, त्यांना भीती आहे चेहरा दाखवला तर जनता मत देणार नाही
  • पंतप्रधान मोदींची एकाधिकार शाही आहे
  • वेळ द्यायला पाहिजे, पण काम करत नाहीय
  • जाहिरातबाजी आणि इव्हेंट मॅनेजमेंट करणारं मोदी सरकार
  • पुढील १० वर्षात आम्ही काय करणार, हे महत्त्वाचं आहे...
  • आमचं व्हिजन आणि आव्हानं मांडतोय
  • पंतप्रधानांच्या कार्यक्रमात झालेल्या हुडिंगमुळं महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान दुखावला
  • आरटीआय कायदा काँग्रेसनं आणला, त्यामुळंच अनेक घोटाळे पुढे आले
  • पृथ्वीराज चव्हाण हे बुद्धीबळाच्या पटावरचे वजीर, त्याचं स्पष्ट उत्तर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.