... ही मुलगीही वडिलांच्या प्रचारासाठी उतरलीय मैदानात!

Updated: Oct 13, 2014, 02:35 PM IST


अंकिता पाटील

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांची कुटुंबीयही प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसले... इंदापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही त्यांचं सगळं कुटुंबच प्रचार करताना दिसलं. 

प्रचारादरम्यान हर्षवर्धन यांची पत्नी भाग्यश्री, मुलगी अंकिता पाटील आणि त्यांचा मुलगा हे सगळेच सदस्य होते. यामध्ये सगळ्यांचं लक्ष खेचून घेत होती ती त्यांची मुलगी अंकिता... 


पाटील कुटुंबीय

हर्षवर्धन पाटील १९९५ पासून सलग विधानसभा निवडणुकीत जिंकत आलेत. परंतु, यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मार्ग वेगळे झाल्यामुळे त्यांनाही मोठं आव्हान आहे. यावेळी, प्रचारादरम्यान अंकिताही आपल्या वडिलांनाच विजय मिळवून देण्याचं आवाहन लोकांना करताना दिसतेय. 

अंकिता तिच्या वडिलांबरोबर खूपच कमी वेळा दिसलीय. तिनं पुण्यातूनच मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय. सध्या ती पुण्यातल्याच एका साखर कारखान्याची संचालक म्हणून कामकाज पाहतेय. अंकिताची आई आणि हर्षवर्धन पाटील यांची पत्नी भाग्यश्री यादेखील एका साखर कारखान्याच्या संचालकपदी विराजमान आहेत.

तसं, फॅशनेबल वस्तूंची अंकिताला हौस आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी डिझायनिंग कार्यक्रमांत ती अनेकदा भाग घेते.   


पाटील कुटुंबीय प्रचारात दंग

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.