कोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे!

राजकारणात काहीही होऊ शकतं हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं. आज एका पक्षात निष्ठावंत असणारा कार्यकर्ता संध्याकाळ होण्याअगोदर दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेला असतो. एवढंच नव्हे तर सध्या अनेक ठिकाणी वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर भाऊ तिसऱ्याच पक्षात असं चित्र पहायला मिळतंय. कोल्हापुरातही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय.  

Updated: Sep 30, 2014, 07:34 AM IST
कोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे! title=

कोल्हापूर: राजकारणात काहीही होऊ शकतं हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं. आज एका पक्षात निष्ठावंत असणारा कार्यकर्ता संध्याकाळ होण्याअगोदर दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेला असतो. एवढंच नव्हे तर सध्या अनेक ठिकाणी वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर भाऊ तिसऱ्याच पक्षात असं चित्र पहायला मिळतंय. कोल्हापुरातही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय.  

महादेवराव महाडिक.... काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार... केवळ काँग्रेसचाच प्रचार करणार असं सांगणाऱ्या महाडिकांचे पूत्र अमल महाडिक भाजपात दाखल झालेत... ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतायत. राजकीय विरोधक सतेज पाटलांना काहीही करुन थांबवण्यासाठीच ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतायत. एवढंच नव्हे तर महादेवराव महाडीक यांचे पुतणे धनंजय महाडीक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळं वडील काँग्रेसमध्ये, मुलगा भाजपात तर पुतण्या राष्ट्रवादीत असे तीन पक्षांचे झेंडे महाडिक घराण्यात पहायला मिळतायत.

तर दुसरीकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सतेज पाटील यांचे भाऊ आणि राज्यपाल डी.वाय.पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य डी.पाटील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे ठाकलेत. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळालीय. त्यामुळं पाटील घराण्यातही दोन पक्षांचे झेंडे दिसून येतायत. 

प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, पण असं असलं तरी एकाच घराण्यात दोन किंवा तीन राजकीय पक्षांचे झेंडे पहायला मिळत असतील तर मतदारराजाच्या मनामध्ये नक्कीच नेत्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण होणं स्वाभाविकच आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.