नागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!

निवडणूक रणधुमाळीत युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नाहीयत. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. 

Updated: Oct 14, 2014, 06:48 PM IST
नागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा! title=

नागपूर: निवडणूक रणधुमाळीत युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नाहीयत. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. 

नागपुरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. शासकीय कंत्राटदार असल्यानं भाजप उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज बाद झाला होता. त्याविरोधात भाजपानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. पण दिलासा न मिळाल्यानं भाजपनं सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भाजपाची याचिका फेटाळल्यानं सावनेरमधून भाजप उमेदवार लढणार नाही हे स्पष्ट झालंय. 

त्यानंतर भाजपानं सावनेरमधील शिवसेनेचे उमेदवार विनोद जीवतो़डे यांना पाठिंबा जाहिर केला असल्याचं नागपूर भाजप ग्रामीणचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी जाहिर केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.