औरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप

जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated: Oct 17, 2014, 06:55 PM IST
औरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप   title=

औरंगाबाद : जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मतदानानंतर औरंगाबादच्या दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच धाकधूक वाढलीये.. 2009च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 15 टक्के वाढली आहे त्यामुळं ही वाढलेली टक्केवारी लोकसभेच्याच मार्गाने गेली तर अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा धुळीस मिळणार आहे.  एकूण 69.33 टक्के मतदान झाले.  2009मध्ये 54.13 टक्के मतदान झाले होते.  

एक नजर मतदानाच्या टक्केवारीवर

मतदारसंघ 2009 चे मतदान  2014 चे मतदान
सिल्लोड  71.6  75.26 
कन्नड  66.46     68.6 
फुलंब्री  66.48 73.00
औरंगाबाद मध्य 54.24 65.18
औरंगाबाद प.  50.20 64.33 
औरंगाबाद पूर्व 52.81 66.71
पैठण 69.08 73.78 
गंगापूर 61.66 67.82 
वैजापूर  68.57 70.10 

ही आकडेवारी पाहाता काही ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणात मतदान झालय. त्यात खास करून औरंगाबाद पूर्वमध्ये झालेली मतदानाच्या वाढीनं गेली 15 वर्ष आमदार आणि मंत्री असलेले राजेंद्र दर्डा यांची झोपच उडाली आहे. .भाजपाची चांगलीच हवा पसरल्यानं दर्डांना फटका बसू शकतो, तर काँग्रेसचे दुसरे मंत्री अब्दुल सत्तारांना सुद्दा सिल्लोडमध्ये  हिच चिंता भेडसावते आहे, तर एमआयएमच्या प्रवेशानं औरंगाबादचा शिवसेनेचा मध्य मतदारसंघही हादरला आहे.

या टक्केवारीनं हादरलेली ही नेतेमंडळी झालेल्या मतदानाचा अभ्यास करण्यातच वेळ घालवताय. एक्झीट पोलमुळंही यांच्या पायाखालची वाळू सरकरलीच आहे त्यामुळं  आता हे वाढलेलं मतदान किती बदल घडवणार हे पाहणं महत्वांचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.