खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड

हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर पक्षाने मनोहर लाल खट्टर यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. खट्टर हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होतील.

Updated: Oct 21, 2014, 02:18 PM IST
खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड title=

चंदीगड : हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर पक्षाने मनोहर लाल खट्टर यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. खट्टर हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होतील.

काँग्रेसला धूळ चारत हरियाणात भाजपाने आपले कमळ फुलवले. त्यानंतर नव्याने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजपने मनोहर लाल खट्टर यांची  मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे. भाजपा आमदारांच्या बैठकीता मंगळवारी हा निर्णय झाला.

मतदारसंघातून प्रथमच विधानसभेत निवडून आलेल्या खट्टर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत खट्टर यांचे नाव सर्वात पुढे होते. पक्षात सक्रिय असलेले खट्टर हे संघाच्याही जवळचे मानले जातात.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.