महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे न्यायचंय - पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रात भाजपला बहुमत द्या, असे आवाहन करत  विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणे, हे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 6, 2014, 12:32 PM IST
महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे न्यायचंय - पंतप्रधान मोदी title=

बीड : महाराष्ट्रात भाजपला बहुमत द्या, असे आवाहन करत  विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणे, हे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत केले.

पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम खाडे-मुंडे यांच्या प्रचारासाठी मोदी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले, महाराष्ट्रात दरवर्षी ३७०० शेतकरी आत्महत्या करतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर, त्यासाठी राज्यात सत्तापालट गरजेचा आहे.

महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ असला तरी, विकासाच्या दृष्टीने पाहिल्यास दोन्ही राज्यांमध्ये मोठी तफावत आहे. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला बहुमताने सत्तेत आणा. जेणेकरून, मी दिल्लीत बसून महाराष्ट्राची सेवा करू शकेल. मात्र, मतदारांनी महाराष्ट्रात येण्याचे दरवाजेच बंद केले, तर केंद्र सरकार विकास कसा काय करणार, असा सूचक सवालही नरेंद्र मोदींनी या सभेत केला. 

महाराष्ट्रात दरवर्षी ३७०० शेतकरी आत्महत्या करतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर, त्यासाठी राज्यात सत्तापालट गरजेचा असल्याचे मोदींनी म्हटले. गोपीनाथ मुंडे असते तर, मला महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराला येण्याची गरजच लागली नसती, अशी भावनिक साद घालत मोदी यांनी मतदारांना राज्यात भाजपचे सरकार आणण्याचे आवाहन केले. 

आघाडी सरकारच्या गेल्या १५ वर्षांतील कारभारामुळे महाराष्ट्राची एक संपूर्ण पिढी बरबाद झाली आहे. मात्र, दुसरीकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना- भाजप यांच्या तुटलेल्या युतीसंदर्भात भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. 



तुफान गर्दी

नरेंद्र मोदींचं भाषण...

* जाता जाता मोदींनी केलं स्वच्छतेचं आवाहन 
* गोपीनाथ मुंडेंचं रेल्वेचं स्वप्नही पूर्ण करायचंय... - मोदी
* मतदान करताना गोपीनाथ मुंडेंचं स्मरण करा
* गोपीनाथ मुंडे यांची कमतरता मी भासू देणार नाही - मोदी
* महाराष्ट्राचं भलं करण्याचा संकल्प करा... मी खांद्याला खांदा उभा राहीन 
* केवळ भ्रष्टाचार बंद केला तरी तेवढ्या पैशांत महाराष्ट्राचं भलं होईल
* जपान-चीन भारतात विकासासाठी मदत करणार
* हायस्पीड ट्रेनसाठी जपान मदत करणार
* अमेरिकेत हिंदुस्थानचा डंका कुणी वाजवला...? भारताचा सन्मान अमेरिकेलाही मान्य करावं लागला... मोदीमुळे नाही... सव्वाशे करोड देशवासियांमुळेच 
* याच छोट्या छोट्या लोकांनी मोठ्या मतांनी आमचं सरकार निवडून दिलंय... 
* छोट्या छोट्या लोकांची मोठी-मोठी कामं मला करायचीत...
* ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे... 
* गोपीनाथ मुंडेंचंही कर्ज आहे आमच्यावर... 
* सगळ्या कमी भरून काढून महाराष्ट्राला गुजरातपेक्षाही पुढे न्यायचंय
* दिल्लीत बसून मला महाराष्ट्राची सेवा करायचीय 
* राष्ट्रवादी-काँग्रेस एकाच गोत्राचे चक्के-बक्के... वैयक्तिक कारणांमुळे दुकानं वेगळी
* महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टीचं स्थिर सरकार हवंय
* मुख्यमंत्री बदलले पण राज्याचं भलं झालं नाही
* देशाला गती देण्याची महाराष्ट्रात ताकद... पण, गेल्या १५ वर्षांत सगळं ठप्प झालंय
* देशाला वाचवायचं असेल तर महाराष्ट्राला वाचवायला हवं
* गोपीनाथ माझा छोटा भाऊ होता... छोट्या भावाच्या नावावर महाराष्ट्रात मागण्यासाठी आलोय
* महाराष्ट्र मोठा भाऊ... गुजरात हा छोटा भाऊ
* १५ वर्ष म्हणजे एका संपूर्ण पिढीला वाया घालवलंय सरकारनं
* महाराष्ट्र का बच्चा बच्चा गोपीनाथ है....
* विराट जनसागर मुंडेंच्या तपस्येचं फळ
* ...कदाचित ईश्वराला माझ्यापेक्षाही जास्त गोपीनाथ मुंडेंची गरज असावी
* आज गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात येण्याचीही गरज नव्हती
* पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात


पंकजा मुंडे यांचं भाषण

नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय कन्या आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे-खाडे यांचं पहिलंच जाहीर भाषण झालं. या भाषणातून पहिल्यांदाच प्रीतम यांचा आत्मविश्वासही दिसून आला. त्यानंतर पंकजा मुंडेंनीही  'मी उतणार नाही... मी मातणार नाही... घेतला वसा टाकणार नाही' म्हणत जनतेला साद घातली... 

पंकजा मुंडे
* मी उतणार नाही... मी मातणार नाही... घेतला वसा टाकणार नाही
* आपल्या पित्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा वसा घेतलेल्या या मुलीला तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या - पंकजा
* पंकजा मुंडे समजून जिल्ह्यातील भाजपच्या सहा उमेदवारांना विजयी करा... मला मान खाली घालायला लावू नका
* ३५ वर्ष माझ्या पित्यानं या जिल्ह्याची सेवा केली... हाडाची काडं केली... अथक परिश्रम घेतले
* चारा-शेण खाल्लेले नेतेही या जिल्ह्यात आहेत
* बीडला एक औद्योगिक नगरी बनविण्यासाठी आम्हाला मदत मोदी देतील - पंकजा  
* गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मोदींनी डोक्यावर ठेवलेल्या हातामुळे माझं दु:ख नाहीसं झालं - पंकजा मुंडे 
* सभास्थळी मोदींचं आगमन


प्रीतम मुंडे - खाडे

प्रीतम मुंडे खाडे

* जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
* तुमचं मत हे मुंडे साहेबांना आदरांजली असेल
* गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार करणार
* बीडमध्ये गोपीनाथ मुंडे प्रीतम मुंडे - खाडे यांचं भाषण
* प्रीतम मुंडे - खाडे यांचं पहिलंच जाहीर भाषण
* थोड्याच वेळात नरेंद्र मोदींचं होणार भाषण
* नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रचंड गर्दी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.