शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध

राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे.

Updated: Oct 25, 2014, 02:47 PM IST
शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध title=

मुंबई : राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे.

भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार अल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. अल्पमतात भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. गेले अनेक दिवस शिवसेनेला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याचवेळी महायुतीतील रिपाईंचे नेत रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव युतीसाठी राजी असल्याची माहीती त्यांनी दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी  भाजप नेत्यांच्या भेटीगाठींसाठी धावपळ होताना दिसत होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. सरसंघचालक मोहन भागवत काल रात्री दिल्लीहून परतल्यानंतर नितीन गडकरी आज सकाळी त्यांच्या भेटीला आर. एस. एस.च्या महाल मुख्यालयात पोहोचले. काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनीही मोहन भागवतांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चा रंगत होती, कोण मुख्यमंत्री होणार, याची. त्याचवेळी विनोद तावडे यांच्या घरी दफडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी बैठक झाली. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्यास राज्यातील भाजप नेत्यांचा विरोध केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

त्यामुळे भ्रष्टवादी असा उल्लेख करणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याचे जवळपास निश्चित केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा  भाजप करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष, लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.