दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय. 

Updated: Oct 1, 2014, 09:16 PM IST
दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय? title=

पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय. 

जे कार्यकर्ते पक्षाचं काम करणार नाहीत त्यांना अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत विविध सभांमध्ये कार्यकर्त्यांना कित्येकदा दम भरलाय.

मात्र दादांनी एवढा दम भरुनही लोकसभा निवडणुकीत सध्याचे पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ यांच्यासह अनेक नगरसेवकांनी लक्ष्मण जगताप यांचं काम केलं. आता विधानसभा निवडणुकीतही अजित दादांना भोसरी आणि चिंचवडमध्ये बंडखोरीचा सामना करावा लागतोय. आता पुन्हा एकदा अजितदादांनी कार्यकर्त्यांना पक्षाचं काम करा नाहीतर राजीनामा द्या अशा शब्दात खडसावलंय.

अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय खरा पण भोसरी विधानसभा मतदार संघात स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगेंच्या बंडानंतर दत्ता साने, सुरेश म्हात्रे, शांताराम भालेकर, अरुणा भालेकर या नगरसेवकांसह अनेक आजी माजी पदाधिकारी दादांचा आदेश धाब्यावर बसवत महेश लांडगेंचं काम करतायेत. तर चिंचवडमध्ये बंडखोर आणि भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणाच कामाला लागणार असल्याचं चित्र आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.