प्रीतम मुंडे यांच्याकडून नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक

गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना ६ लाख ९२ हजार मतं मिळाली आहेत. हा लोकसभेतील एक मोठा विक्रम मानला जात आहे. प्रीतम मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.

Updated: Oct 20, 2014, 11:14 AM IST
प्रीतम मुंडे यांच्याकडून नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक title=

 बीड : गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना ६ लाख ९२ हजार मतं मिळाली आहेत. हा लोकसभेतील एक मोठा विक्रम मानला जात आहे. प्रीतम मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदार संघासाठी ही निवडणूक झाली. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचं म्हटलं होतं, तर काँग्रेसने त्यांच्याकडून अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. मुंडे कुटुंबीयांपैकी उमेदवार असल्यानं उमेदवार न देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता.

 धनंजय मुंडे यांचा पराभव
 भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पकंजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी मिळवला आहे. पकंजा मुंडे यांनी आपला चुलत भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा पराभव केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.