पृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी तुटल्याचं खापर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यावर फोडलंय. ते पुण्यात बोलत होते. 

Updated: Oct 1, 2014, 10:41 AM IST
पृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती  - शरद पवार title=
फाईल फोटो

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी तुटल्याचं खापर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यावर फोडलंय. ते पुण्यात बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण यांची मानसिकता कधीच आघाडी टिकवण्याची नव्हती... असा घणाघाती आरोप पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलाय. राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानंच त्यांनी वातावरण निर्माण केलं, असाही आरोप पवारांनी यावेळी चव्हाण यांच्यावर केलाय. 

आघाडीचा धर्म पाळण्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण सरकारनं नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. पण, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची मानसिकता मात्र वेगळी होती... त्यामुळे सगळं काही बिघडलं... असं पवार यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलंय. 

चव्हाण यांनी आपली एक स्वच्छ प्रतिमा लोकांसमोर बनवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्यासाठी एक दूषित वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला, असंही पवारांनी यावेळी म्हटलंय. 

भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘छुपी युती’ संबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राजकीय फायद्यासाठी पसरवण्यात आलेल्या या अफवा असल्याचं पवारांनी म्हटलंय. 

पण, यावेळी त्यांनी मोदींचं मात्र तोंडभरून कौतुक केलं... अमेरिकेत ‘मार्केटिंग’ मिशन आणि तिथं एनआरआयसोबत चर्चा सुरु करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.