‘राक्षसी महत्त्वकांक्षे’वर आबा म्हणतात...

मुख्यमंत्र्यांनी केलेली ‘राक्षसी महत्त्वकांक्षे’ची टिप्पणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय.

Updated: Sep 29, 2014, 12:46 PM IST
‘राक्षसी महत्त्वकांक्षे’वर आबा म्हणतात... title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी केलेली ‘राक्षसी महत्त्वकांक्षे’ची टिप्पणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय.

‘विधानसभेत कधीही  निवडून न येता, चार वर्ष मुख्यमंत्रीपद भोगणं... हीच राक्षसी महत्त्वकांक्षा’ असल्याचं सांगत आबांनी नुकतेच मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार केलाय. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये आर. आर. पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे’च आघाडी तुटली असा आरोप, पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावर, ‘काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असून ते दिल्लीतून ज्या खुर्चीच्या ओढीनं राज्यात आले, त्यांना कोणती महत्त्वाकांक्षा होती? तिला राक्षसी महत्त्वकांक्षा म्हणायचं का?’ असं म्हणत अजित पवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.