बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.

Updated: Oct 11, 2014, 04:41 PM IST
बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार title=

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.

‘मी मनसेच्या ज्या उमेदवाराबद्दल बोलत होतो त्याच्यावर अगोदरपासूनच एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता... निवडणुकीचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्याच्यावर दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला... मी जे वक्तव्य केलं ती या आरोपी उमेदवारावर केलेली उपरोधिक टीका होती... मी जे बोललो त्यात महिलांचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता’ असं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

मनसेच्या उमेदवारांला आमदार व्हायचे आहे, पण त्याला बलात्कार करायचा होता, तर निवडणुकीनंतर करायला हवा होता, अशी धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केलंय. आबांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं ते तासगाव, कवठे महाकाळच्या सुधाकर खाडे या मनसेच्या उमेदवाराबद्दल...  

'महिलांच्या बाबतीत मी जे निर्णय घेतले... जी धोरणं घेतली त्यामुळे माझं महिलांबद्दल काय भावना आहेत त्या साऱ्या महाराष्ट्राला माहित आहेत...' असं म्हणत आबांनी आपल्या वक्तव्याकडे पाठ फिरवलीय. 

यावेळी, आबा आपण अनावधानानं महिलांच्या केलेल्या या अपमानामुळे माफी मागणार का? असं जेव्हा आर आर पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत माफी मागण्यास नकार दिलाय. 

महत्त्वाचं म्हणजे, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरों मे छोटे छोटे हादसे होते रहते हैं...’ असं म्हणणाऱ्या तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.