फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. 

Updated: Oct 25, 2014, 11:51 AM IST
फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट title=

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. 

सरसंघचालक मोहन भागवत काल रात्री दिल्लीहून परतल्यानंतर नितीन गडकरी आज सकाळी त्यांच्या भेटीला आर. एस. एस.च्या महाल मुख्यालयात पोहोचले. काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनीही मोहन भागवतांची भेट घेतली होती. दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणविसांचं नाव निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशा शब्दांत संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी संघाचा कल कोणाकडे आहे, याचे संकेत दिलेत.

फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवणही त्यांनी सांगितली. तसंच काही दिवसांच्या प्रचारामुळे २५ वर्षांची युती तुटू नये, अशी आपली अपेक्षा असल्याचंही वैद्य म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.