'भाजप'चं 'ढोंग'समोर आणण्यात महाराष्ट्र हित

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने आपल्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं ढोंग जनतेसमोर आणण्यात महाराष्ट्र हित असल्याचं सामनाने म्हटलंय. भाजपने लग्न बारशात पितृपक्षाचे जेवण भरकरण्यासारखे ढोंग सुरू केले असल्याच सामन्यात म्हटलंय.

Updated: Oct 14, 2014, 01:45 PM IST
'भाजप'चं 'ढोंग'समोर आणण्यात महाराष्ट्र हित title=

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने आपल्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं ढोंग जनतेसमोर आणण्यात महाराष्ट्र हित असल्याचं सामनाने म्हटलंय. भाजपने लग्न बारशात पितृपक्षाचे जेवण भरकरण्यासारखे ढोंग सुरू केले असल्याच सामन्यात म्हटलंय.

भाजपचे पुढारी जनतेला विचारतील, शिवसेना नक्की कोणाशी लढणार आहे, शिवसेनेचा खरा शत्रू कोण?, भाजपचे सांगणे बरोबर आहे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी हा मरून पडलेला साप आहे, त्या सापापासून धोका नाही, हे आम्ही स्पष्ट करीत आहोत. त्यामुळे आमच्या एकेकाळच्या मित्रांचे ढोंग जनतेसमोर आणणे, हे महाराष्ट्र हितासाठी आम्ही कर्तव्यपालन मानतो, असं सामनाच्या लेखात म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.