शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण हादरलं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Updated: Oct 20, 2014, 08:13 PM IST
शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण हादरलं title=

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीची भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. राज्याच्या विकासाठी एका स्थिर सरकारची गरज असल्याचं कारण त्याच्यामागे सांगण्यात आलं.

अनेकांची झोप उडाली

मात्र आज पवारांनी आणखी एक गौप्यस्फोट करून सर्वच राजकीय पक्षांची झोप उडवून दिली आहे. एकंदरीत भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. 

अशी आहेत समीकरणं

भाजपला १२२ जागा मिळाल्या आहेत, शिवसेनेला ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१, मनसे १ आणि १९ अपक्ष निवडून आले आहेत.

भाजपला राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला तर १२२ + ४१ = १६३ चा भाजपला आकडा गाठता येणार आहे. भाजपला शिवसेनेने पाठिंबा दिला, तर १२२ + ६३ = १८५ पर्यंत आकडा जाणार आहे. 

मात्र शरद पवारांनी सांगितल्यानुसार शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंब्याचा काँग्रेसचा प्रस्ताव असेल, तर शिवसेना ६३, राष्ट्रवादी ४१, काँग्रेस ४२ एकत्र आले तर, ६३ + ४१ + ४२ = १४६. पण हे सरकार काठावर असल्याने, तसेच आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर काँग्रेसने ज्या सरकारला पाठिंबा दिला आहे, ते जास्त काळ चाललेलं नाही, शरद पवारांनी म्हटलंय.

शिवसेनेने काही अपक्ष आमदारांनी फोन केल्याच्याही बातम्या येत आहेत, अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही बोल आल्याचं त्यांनी म्हटलंय. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचं दिसतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.