'शिवसेनाच स्वबळावर सत्ता स्थापन करणार'

शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. 

Updated: Oct 17, 2014, 10:30 PM IST
'शिवसेनाच स्वबळावर सत्ता स्थापन करणार' title=

मुंबई : शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. 

तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचं नेतृत्व करतील असंही संजय राऊत यांनी नमूद केलंय.  

भाजप मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयाला येईल, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय.

२५ वर्षांची युती तुटल्याने शिवसेना आणि  भाजप एकमेकांसमोर विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले होते. तसचे निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले होते.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.