राज्यात शिवसेनेचीच लाट, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास

राज्यात शिवसेनेची सुप्त लाट असून, आज ती बाहेर पडली असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कुटुंबीयांसमवेत बुधवारी सकाळी मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी शिवसेनेचं पूर्ण बहुमताचंच सरकार राज्यात सत्तेवर येईल, असा दावा केला. 

Updated: Oct 15, 2014, 06:54 PM IST
राज्यात शिवसेनेचीच लाट, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास title=

मुंबई: राज्यात शिवसेनेची सुप्त लाट असून, आज ती बाहेर पडली असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कुटुंबीयांसमवेत बुधवारी सकाळी मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी शिवसेनेचं पूर्ण बहुमताचंच सरकार राज्यात सत्तेवर येईल, असा दावा केला. 

लोकशाही पद्धतीमध्ये सर्वसामान्य जनता सर्वशक्तीमान असते, असं सांगून ते म्हणाले, शिवसेनेची सुप्त लाट असल्याचं मला राज्यात प्रचार दौऱ्यावेळी जाणवलं. तीच लाट आज मतदानासाठी बाहेर पडली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांसाठी आपलं रक्त आटवलं. याचा मतदार नक्की विचार करतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्या मनात पूर्ण आदर असल्याचं सांगून त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही सुद्धा मोदींचा प्रचार केला होता. मात्र, भाजपनं त्यावेळी आमचा वापर करून घेतला आणि आता युती तोडून आम्हाला दूर केलं, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. 

प्रचारासाठी राज्यात फिरत असताना जनता मला मुख्यमंत्री होण्यासाठी साद घालत होती. त्याचाच विचार करून आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पाहा व्हिडिओ –

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.