'मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं नाही'

शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. एनडीएची सत्ता केंद्रात आणण्यासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. यामुळे आम्ही राजीनामा देणार नसल्याचं अनंत गिते यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Oct 1, 2014, 04:29 PM IST
'मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं नाही' title=

मुंबई : शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. एनडीएची सत्ता केंद्रात आणण्यासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. यामुळे आम्ही राजीनामा देणार नसल्याचं अनंत गिते यांनी स्पष्ट केलं आहे.

अनंत गिते यांच्या राजीनाम्यावर यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घुमजाव केलं आहे. अनंत गिते केंद्रातून राजीनामा देणार असे संकेत यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र आता अनंत गिते राजीनामा देणार नसल्याने शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे यांची कांदिवलीत सभा झाली होती, या सभेत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीविषयी बोलतांना म्हटलं होतं, शिवसेनेला बाळासाहेब असतांना अशी वागणूक दिली असती, तर बाळासाहेबांना यांना कधीच लाथाळलं असतं, बाळासाहेबांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले असते. यासाठी राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेचं बाळासाहेब हयात असतानाचं उदाहरण दिलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.