घरातून रागावून गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार

घरातील लोकांशी झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात नेरुळमधून घर सोडून कोपरखैरणे येथील गार्डनमध्ये गेलेल्या एका 12 वर्षीय मुलीवर दोघा तरुणांनी संधी साधून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Updated: Nov 30, 2016, 11:23 PM IST
घरातून रागावून गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार title=

कोपरखैरणे : घरातील लोकांशी झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात नेरुळमधून घर सोडून कोपरखैरणे येथील गार्डनमध्ये गेलेल्या एका 12 वर्षीय मुलीवर दोघा तरुणांनी संधी साधून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

तरुणांवर बलात्कारासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार या घटनेतील पिडीत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गेल्या मंगळवारी  किरकोळ कारणावरुन घरतल्या लोकांशी भांडण झाले होते. त्यामुळे या भांडणाच्या रागामध्ये ती घर सोडून कोपरखैरणे येथील गार्डनमध्ये गेली होती.

गार्डनमध्ये  गेली असता तिथे तिला तिच्याच ओळखीचे दोघे भेटले आणि त्यांनी तिच्यावर अति प्रसंग केल्याची माहिती पोलिसानी दिली आहे