ठाण्यात बारमध्ये छमछम, 16 महिलांना अटक

शहरात पुन्हा बारमधील छमछम सुरू झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बारमध्ये संगीताच्या तालावर ग्राहकांशी अश्लील चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या वेटर-कम-बारबालांवर नोटा उधळल्या जात होत्या.

Updated: Jul 9, 2014, 08:14 AM IST
ठाण्यात बारमध्ये छमछम, 16 महिलांना अटक title=

ठाणे : शहरात पुन्हा बारमधील छमछम सुरू झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बारमध्ये संगीताच्या तालावर ग्राहकांशी अश्लील चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या वेटर-कम-बारबालांवर नोटा उधळल्या जात होत्या.

ही माहिती मिळताच पोलिसांनी ठाणे उथळसर नाकामधील ताल बारमधून महिला वेटर आणि बारमालकासह 56 जणांना अटक केली आहे. या प्रमाणे उल्हासनगरमध्येही 16 महिलांसह 55 जणांना अटक करण्यात आली आहे. 

यात कारवाईत 1 लाख 22 हजार 195 रूपयांची रोकड जमा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधील कारवाई प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.