औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यीनीची आत्महत्या

Last Updated: Monday, March 20, 2017 - 23:08
औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यीनीची आत्महत्या

औरंगाबाद : दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडलीये.

वाळुंज येथे ही घटना घडलीये. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. आज दुपारी ती विज्ञान भाग २ हा पेपर देऊन आली. 

मात्र त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचा फायदा घेत गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, विद्यार्थिनीने ही आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. 

First Published: Monday, March 20, 2017 - 23:08
comments powered by Disqus