अमरावतीत कारने १० जणांना चिरडले

 अमरावतीच्या बडनेरा स्टेशनजवळ एका भरधाव कारनं १० जणांना चिरडलंय. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला.

Updated: Jul 5, 2014, 01:38 PM IST
अमरावतीत कारने १० जणांना चिरडले title=

अमरावती : अमरावतीच्या बडनेरा स्टेशनजवळ एका भरधाव कारनं १० जणांना चिरडलंय. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर सात जण गंभीर जखमी आहेत. अपघातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

या अपघातानंतर येथील जमाव संतप्त झाला होता. रस्त्यावर झोपल्या लोकांच्या अंगावर कार घातल्यामुळे कोणाला काहीही समजायच्या आत किंकाळ्यांचा आवाज झाला. त्यावेळी झोपेतून उठून अनेक लोक सैरावैरा पळत होते. काहींहीनी गाडीकडे धाव घेतली. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. तर कारच्या ड्रायव्हरचा पोलिसांनी अटक केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.