स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपुरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडलाय. 

Updated: Aug 15, 2015, 09:22 PM IST
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न title=

चंद्रपूर : चंद्रपुरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडलाय. 

दमपूर-मोहदा इथं विठ्ठलराव जाधव या ज्युनियर कॉलेजमध्ये वारंवार मागणी करूनही मुलभूत शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. याच्या निषेधार्थ महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम सुरु असताना या चौघांनी गीत सादर करण्याचं सांगत स्टेजवर एंट्री घेतली. 

स्टेजवर येऊन प्लास्टिक बाटल्यामध्ये भरून आणलेलं विष या विद्यार्थ्यांनी प्राशन केलं. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना रोखत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. 

प्रेमदास आडे, कृष्णा राठोड, प्रफुल्ल राठोड, प्रवीण जाधव या चारही विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.. याबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय... तर मागण्या पूर्ण करणारच होतो असं सांगत मुख्याध्यापकांनी सारवासारव केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.