धुळ्यात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील ५ जणांचा बळी

शहरातील पाचकंदील भागात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील पाच जणांचा बळी घेतला आहे. पाचकंदील परिसरातील कापड बाजाराच्या बाजूला राहणा-या राम शर्मा यांच्या घराला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. शर्मा यांच्या घरात यायला आणि जायला एकाच दरवाजा असून इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या अग्नितांडवात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात राम शर्मा, त्यांच्या आई शोभाबाई छबूलाल शर्मा, पत्नी जयश्री, बारा वर्षांचा मुलगा साई आणि दहा वर्षांचा मुलगा राधे यांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Mar 26, 2017, 09:52 AM IST
धुळ्यात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील ५ जणांचा बळी title=

धुळे : शहरातील पाचकंदील भागात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील पाच जणांचा बळी घेतला आहे. पाचकंदील परिसरातील कापड बाजाराच्या बाजूला राहणा-या राम शर्मा यांच्या घराला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. शर्मा यांच्या घरात यायला आणि जायला एकाच दरवाजा असून इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या अग्नितांडवात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात राम शर्मा, त्यांच्या आई शोभाबाई छबूलाल शर्मा, पत्नी जयश्री, बारा वर्षांचा मुलगा साई आणि दहा वर्षांचा मुलगा राधे यांचा मृत्यू झाला आहे.

आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यामागे काही घातपात आहे का यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु आहे. अग्निशमन दलाचा बंब उशिरा आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. वेळेवर बंब आला असता तर कुणाचातरी जीव वाचवता आला असता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.