पाईपलाईन फुटल्याने 50 फूट उंच पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया

गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 20, 2017, 09:51 AM IST
पाईपलाईन फुटल्याने 50 फूट उंच पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया title=

पनवेल : गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील गव्हाण चिरनेर मार्गावरील कंठवली गावाजवळ एका डंपरची पाण्याच्या पाईप लाईनला धडक बसली आणि ती फुटली. त्यामुळे सुरुवातीला पाण्याची गळती सुरु झाली. पाण्याचा वेग वाढल्याने चक्क हवेत फवारा उडत राहिला.