देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवणार - पंतप्रधान मोदी

 नागपूरला मेट्रो सिटीच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचवेळी देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवण्यात येणार आहेत, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Updated: Aug 22, 2014, 07:19 AM IST
देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवणार - पंतप्रधान मोदी title=

नागपूर : नागपूरला मेट्रो सिटीच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचवेळी देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवण्यात येणार आहेत, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन पार पडले तसेच नागपुरातील दोन उड्डाणपुलांचे उद्घाटनही झाले. यानिमित्तानं कस्तूरचंद पार्कवर मोदींची भव्य जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी ही माहिती स्पष्ट केली. मेट्रो रेल्वे आता स्टेटस सिम्बॉल बनली असून, नागपूरला मेट्रो सिटीच्या नकाशावर आणणार, असं मोदींनी यावेळी सांगितलं. शहरीकरण हे संकट नाही, तर विकासाची संधी आहे. देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवण्यात येणार आहे, असं त्यांनी भाषणात स्पष्ट केलं.

भ्रष्टाचारामुळे देश बरबाद झाला असून, गेल्या ६० वर्षांत संधी मिळेल त्यांनी देश लुटला. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी मला साथ द्या, असं आवाहनही त्यांनी नागपूरकरांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजशिष्टाचार पाळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी निषेधाचे काळे झेंडे फडकावले. त्याशिवाय स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी काळे झेंडे दाखवून मोदींचं स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, पुणे मेट्रोचा प्रस्ताव ३ दिवसांत मंजूर करणार असल्याचं केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी सांगितलंय. नागपूर मेट्रोच्या उदघाटनाच्या वेळी त्यांनी ही घोषणा केलीय. पुणे मेट्रोचा प्रस्ताव काल संध्याकाळी माझ्याकडे आला. आता तो तीन दिवसांत मंजूर करणार असल्याचं नायडूंनी सांगितलंय. त्याचबरोबर कुलाबा-सिप्झ हा मेट्रोचा तिसरा टप्पाही मंजूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.