पुण्यात जळीतकांड, ९० गाड्या पेटविल्या

 पुण्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या जळीतकांडानं एकच खळबळ माजली आहे.  सिंहगड रोडवर ८४ दुचाकी आणि ६ चार चाकी गाड्यांना आज सकाळी अज्ञातांनी आग लावली

Updated: Jun 28, 2015, 12:30 PM IST
पुण्यात जळीतकांड, ९० गाड्या पेटविल्या title=

पुणे : पुण्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या जळीतकांडानं एकच खळबळ माजली आहे.  सिंहगड रोडवर ८४ दुचाकी आणि ६ चार चाकी गाड्यांना आज सकाळी अज्ञातांनी आग लावली. दरम्यान, पोलिसांनी सोसायटयांमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने एका संशयीताला ताब्यात घेतले आहे. 

वेगवेगळ्या सोसायटीमधील किमान 80 ते 90 दुचाकी आणि चारचाकी गाड्या पेटवण्यात आल्यात. अग्निशमन दलाच्याचार गाड्या रवाना करण्यात आल्यात. 

पहाटे 3 वाजून 57 मिनिटांनी सिंहगड रोडवरी डॉमिनोझ पिझ्झा जवळ अंदाजे 29 गाड्या, पहाटे  4 वाजून 10 मिनिटांनी निर्मल टाऊनशिप सुर्यनगरी सनसिटीमध्ये अंदाजे 14 गाड्या, स्वामिनारायण सोसायटीतील अंदाजे 18 ते 20, अक्षय ग्लोरी सोसायटीत 6 ते 8 गाड्या आणि इवधूत सोसायटीतील अंदाजे 12 गाड्या जाळण्यात आल्यात. यामुळे पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय़. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.