जालन्यात भीषण अपघात 4 ठार 5 जखमी..

जालना जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाळ पाटीजवळ झालेल्या अपघात 4 ठार तर 5 जण जखमी झालेत.. 

Updated: Nov 26, 2016, 07:03 PM IST
जालन्यात भीषण अपघात 4 ठार 5 जखमी.. title=

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाळ पाटीजवळ झालेल्या अपघात 4 ठार तर 5 जण जखमी झालेत.. 

भोकरदन सिल्लोड रोडवर कार आणि ट्रक ची सामोरा समोर धडक होऊन हा अपघात झाला.. या अपघातात कार मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला..

संजय बनसोडे,मयनाजी  बनसोडे,श्रेयस बनसोडे,आणि भालचंद्र वाघ अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, कार मधील मयत तिघे एकाच बनसोडे  कुटुंबातील असून यात एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. 

मयत सर्व जण औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या नागझरी गावचे रहिवासी आहे .दरम्यान रात्री एक च्या सुमारास हा अपघात झाल्याने अपघात ग्रस्तांना मदत मिळण्यास बराच विलंब झाला. 

 या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून या प्रकरणी जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..