'रेणू'नं पुन्हा एकदा आपल्या बछड्यांना गमावलं

औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रेणू बिबटच्या दोन पिल्लांचा मृत्यू झालाय. 

Updated: Sep 13, 2016, 11:22 AM IST
'रेणू'नं पुन्हा एकदा आपल्या बछड्यांना गमावलं title=
फाईल फोटो

औरंगाबाद : औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रेणू बिबटच्या दोन पिल्लांचा मृत्यू झालाय. 

दोन दिवसांपूर्वीच रेणूनं या दोन पिल्लांना जन्म दिला होता. महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पिल्लं बरी होती. मात्र, अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.

प्राणीसंग्रहालयात डॉक्टरच नाही

महत्त्वाचं म्हणजे, या प्राणीसंग्रहालयातील डॉक्टरांचं पद हे रिकामंच आहे. त्यामुळे काही अडचण आल्यास बाहेरून डॉक्टरांना बोलवावं लागतं.

या वर्षीच्या मार्च महिन्यात हेमलकसा येथून आमटे यांच्या आनंदवनातून रेणूला औरंगाबादेत आणण्यात आलं होतं. त्या दरम्यानच्या प्रवासात ती गर्भवती होती आणि त्यामुळे तिच्या तीन पिल्लांचा मार्च महिन्यातच मृत्यू झाला होता... या प्रकरणी प्रशासनाच्या चुका झाल्या होत्या आणि उद्यान अधिक्षकांना निलंबितही करण्यात आलं होतं. त्यात पुन्हा रेणूच्याच पिल्लांचा मृत्यू झालाय. मृत्यूचे कारण अजूनही स्पष्टपणे सांगण्यात येत नाहीय.